Sunday, November 18, 2012

Fish Fry Recipe | Halwa Fish Fry

साहित्य :
    Black Pomfret Recipe
  • २ हलवे (तुकडे करून धुवून घेतले)
  • १ टेबलस्पून आलं-लसून-हिरवी मिरची पेस्ट (साधारण एक इंच आलं, ५ पाकळ्या लसून,२-३ हिरव्या मिरच्या )
  • १/२ टीस्पून हळद 
  • लाल तिखट आवडीनुसार 
  • गरम मसाला पावडर आवडीनुसार  
  • अर्ध्या लिंबुचा रस 
  • मीठ चवीनुसार 
  • १/४ वाटी रवा  
  • तेल फ्राय करण्यासाठी
  • कोथिबीर बारीक कापलेली  
कृती :
  1. प्रथम माश्यांच्या तुकड्यांना मीठ, हळद, लिंबू रस लावून १० मिनिटे ठेवा मग त्यातले पाणी काढून टाकून त्याला आलं - लसून पेस्ट, तिखट, गरम मसाला पावडर लावून १५-२० मिनिटे ठेवा.
  2. नंतर रवा लावून Shallow फ्राय करा. आणि कोथिबीरने गार्निश करून गरमागरम सर्व्ह करा.

Thursday, November 1, 2012

Kadhi Recipe-कढी

साहित्य :
  • १ कप दही 
  • २ टीस्पून बेसन
  • ४  पाकळ्या लसून 
  • १ इंच आलं 
  • २-३ हिरव्या मिरच्या 
  • १ टीस्पून जीर
  • १/२ टीस्पून मोहरी
  • किंचित हळद (आवडत असल्यास) 
  • कढीपता १ काडी 
  • हिंग किंचित 
  • कोथिबीर सजावटी साठी 
  • किंचित साखर (आवडत असल्यास )
  • चवीपुरते मीठ 
  • २ टीस्पून तेल 
कृती :
  1. प्रथम दह्यात बेसन टाकून रवीने घुसळून घ्या.त्यात आवश्यक तेवढे (२-३ कप साधारण)पाणी टाका.
  2. नंतर मिक्सरमधून आलं, लसून, जीर, मिरच्या,कढीपता वाटून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, आणि वाटण टाका.
  3. मग लगेच ताक मग त्यात हळद, मीठ, साखर टाका. एक कढ आणा आणि लगेच आच घालवा.
  4. कोथिबीर बारीक कापून कढीवर टाका. गरमागरम भाता सोबत सर्व्ह करा.

टीप :
कढीमध्ये साधी बेसन भजी टाकली तरी सुद्धा कढी छान लागते.(भजी कढीला कढ आल्यावर टाकावी, म्हणजे भजी मुरतील कढीत ) 
हिरव्या मिरची ऐवजी सुक्या काश्मिरी मिरच्याची पण फोडणी देता येईल.